शहापूर, हुबळी - शनिवारी सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर
शहापूरजवळ तसेच कर्नाटकातील हुबळीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 63
वर घडलेल्या दो
वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये एकूण दहा जण जागीच ठार झाले;
तर बाराजण गंभीर
जखमी झाले. शहापूरजवळ एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभे
असलेल्या प्रवाशांना उडवले. यात चौघे जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हुबळीजवळ
बस व ट्रकच्या भीषण अपघातात मुंबईतील सहा जणांचा मृत्यू झाला.
मुंबईहून नाशिककडे सुसाट निघालेल्या इनोव्हा
कारने शनिवारी (17 नोव्हेंबर) शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला
वाहनांची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांना चिरडले. या घटनेत चारजण ठार तर दोघे
गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. इनोव्हा
कारचालकाचे शहापूरजवळ आल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे
सांगण्यात येते. त्यानंतर कार खोल खड्ड्यात जाऊन आदळली.
यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या
चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालकासह दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना ठाणे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दुसरा अपघात
कर्नाटकातील हुबळीनजीक राष्ट्रीय महामार्ग 63 वर घडला. मुंबईहून निघालेल्या एका खासगी
बसला राष्ट्रीय महामार्ग 63 क्र. वर हुबळीजवळ वाळू वाहून नेणार्या
ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला,
तर दहाजण गंभीर
जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
(केआयएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील सर्व मृत प्रवासी
मुंबईतील आहेत.